ममतांचा यू-टर्न, प्रणवदांना पाठिंबा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी यू टर्न घेत प्रणव मुखर्जी यांना आपला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपतीपदाचे यूपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा देणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.

Updated: Jul 17, 2012, 06:05 PM IST

www.24taas.com, कोलकता

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी यू टर्न घेत प्रणव मुखर्जी यांना आपला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपतीपदाचे यूपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा देणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.

ममतांनी प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी त्यांनी अद्याप हामीद अन्सारींना पाठिंबा जाहीर केलेला नाही. हामीद अन्सारी यांच्याबाबत नंतर विचार करणार असल्याचे ममता यांनी सांगितले.

ममता यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस अद्यापही आमच्या पक्षावर हल्ले करीत आहे. मी माझ्या पक्षाचे मत वाया जाऊ नये म्हणून मी प्रणवदांना पाठिंबा दिला असल्याचेही ममता यांनी स्पष्ट केले.

ममतांनी प्रणवदांना दिलेल्या पाठिंब्याचे काँग्रेसने स्वागत केले आहे.