ममता बॅनर्जी काय बरळल्या?

Last Updated: Tuesday, April 17, 2012 - 10:28

www.24taas.com, कोलकाता

 

आता एक अशी बातमी जी ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. वेळोवेळी आपल्या हटवादी आणि विक्षिप्त वागण्यामुळं नेहमीच चर्चैत असणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

 

आता त्यांच्या पक्षानं एक अफलातून फतवा काढला आहे. तृणमुल काँग्रेसच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी सीपीएमच्या कार्यकर्त्यांशी लग्न करु नये असा पक्षातर्फे अधिकृत फतवाच काढण्यात आला आहे.

 

पश्चिम बंगालेचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ज्योतीप्रिया मुल्लीक यांनी एका पत्रकाद्वारे पक्षाच्या कार्यकर्त्यांना हा आदेश दिलाय.  अशा प्रकारची लग्न झाली तर सीपीएमशी लढण्याचा जो दृढ निश्चिय केला आहे त्याला बाधा पोहचेल असं पत्रकात सांगण्यात आलं आहे.

 

 

 

 

 

 First Published: Tuesday, April 17, 2012 - 10:28


comments powered by Disqus