मर्सिडिज बनली 'मार'सिडिज

Last Updated: Tuesday, April 10, 2012 - 15:50

www.24taas.com, नवी दिल्ली

 

नवी दिल्लीच्या पश्चिम विहार भागात मंगळवारी सकाळी एका मर्सिडीजने दोन पोलिसांना उडवलं. यातील एका पोलिसाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा पोलीस जबर जखमी झाला आहे. या पोलिसाला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं.

 

दिल्ली पोलीसांमधील दीपक सिंग चौहान (३९) आणि अमित कुमार (२४) हे पश्चिम विहार भागात रात्री गस्तीवर होते. याचवेळी मागून वेगाने येणाऱ्या गाडीने त्यांना धडक दिली. चौहान यांचा जागीच मृत्यू झाला, तर अमितच्या पाया गंभीर दुखापत झाली आहे.

 

कार चालवत असणारा बिझनेसमन गुरदीप सिंग या घटनेनंतर तिथून पळून गेला, पण घटनास्थळी असलेल्या लोकांकडून पोलिसांना त्याच्या कारचा नंबर मिळाला. याच आधारे पोलिसांनी गुरदीप सिंगला शोधून काढलं. गुरदीप सिंगला कार चालवताना डुलकी लागली होती, त्यामुळे त्याच्या हातून अपघात घडला, असं चौकशीमध्ये आढळन आलं. गुरदीपची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. गुरदीप दक्षिण दिल्लीमधील ग्रेटर कैलास-१चा रहिवासी आहे. गुरदीपचे दक्षिण दिल्ली आणि गुडगाव येथील मॉल्समध्ये रेस्टॉरंट् आहेत. पोलिसांनी गुरदीप विरोधात तक्रार दाखल केली आहे.

First Published: Tuesday, April 10, 2012 - 15:50
comments powered by Disqus