माझ्या जीवाला धोका - मायावती

Last Updated: Wednesday, May 2, 2012 - 14:26

www.24taas.com, नवी दिल्ली

 

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी जास्त सुरक्षा व्यवस्थेची मागणी केली आहे. याबातचे पत्र पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना लिहिले आहे.

 

 
दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर माझे नाव आहे. त्यामुळे मला विशेष सुरक्षा पथकाकडून सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी मागणी करणाऱे पत्र मायावती यांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे सरकार आल्यानंतर मायावती यांच्या सुरक्षा व्यवस्थेत घट करण्यात आली होती. मायावती यांना सुमारे ४०० सुरक्षा रक्षकांची सुरक्षा होती. ती उत्तर प्रदेशच्या सध्याच्या  सरकारच्या सांगण्यावरून कमी करण्यात आली आहे, असे मायावतींनी म्हटले आहे.

First Published: Wednesday, May 2, 2012 - 14:26
comments powered by Disqus