युपीत ६८ जागांसाठी मतदान

Last Updated: Tuesday, February 28, 2012 - 11:03

www.24taas.com, लखनऊ

 

 

उतरप्रदेशमध्ये सहाव्या  टप्प्यासाठी १३ जिल्हांतील ६८ जागांसाठी आज  सकाळी ७ वाजता मतदानाला सुरूवात झाली. सकाळी ९ वाजेपर्यंत १० टक्के मतदान झाले होते.  निवडणुकीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलीस बंदोवस्त ठेवण्यात आला आहे.

 

 

६८ जागांसाठी ८६ महिलांसहित एकूण ११०३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. उतरप्रदेशमध्ये पश्चिम भागात  दिग्गज उमेदवार उभे आहेत.  यामुळे गौतमबुद्धनगर (नोएडा), गाजियाबाद, मेरठ, बागपत, बुलंदशहर, आग्रा, मथुरा, अलीगढ, हाथरस, प्रबुद्धनगर, पंचशीलनगर, मुजफ्फरनगर आणि सहारनपूर या जिल्हांकडे लक्ष लागले आहे. ६८ जागांचे भवितव्य २.१४ कोटी मतदान ठरवणार आहेत.

 

 

सहाव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी २२,१३७ मतदान केंद्रावर हे मतदान होत आहे. यासाठी ३०,०२८  इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर करण्यात येत आहे.  मतदान शांततेत पार पडण्यासाठी  मतदान केंद्रांवर केंद्रीय सुरक्षा बल, राज्य सुरक्षा बल, पोलीस आणि होमगार्ड यांचे सहाय्य घेण्यात आले आहे. सुमारे दीड लाख सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. हरियाणा आणि दिल्लीतील अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

 

 

मायावतींच्या बसपा सरकारमधील पाच मंत्री निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात रामवीर उपाध्याय हे हाथरसमधून तर बरौलीतून जयवीर सिंह, मेरठमधून वेदराज भाटी, चौधरी लक्ष्मी नारायण हे मथुरातून तर सहारनपूरमधून धर्मसिंह सैनी लढत आहेत. त्यामुळे या मतदार संघाकडे लक्ष लागले आहे. तसेच राष्ट्रीय लोकदल (रालोद) प्रमुख अजित सिंह यांचे पुत्र  जयंत चौधरी , भारतीय जनता पक्षाचे नेते  हुकुम सिंह, जनक्रांती पार्टीचे (राष्ट्रवादी)  अध्यक्ष राजवीर सिंह, माजी मंत्री हाजी याकूब कुरैशी तसेच रालोद नेते  कोकब हमीद यांचे भवितव्य आज यंत्रात बंद होणार आहे.First Published: Tuesday, February 28, 2012 - 11:03


comments powered by Disqus