रुपयाची घसरण सुरूच

Last Updated: Wednesday, May 23, 2012 - 12:50

www.24taas.com, नवी दिल्ली

 

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे. रुपयानं आतापर्यंतचा सर्वात मोठा निचांक गाठलाय. आंतराष्ट्रीय बाजारात डॉलरची किंमत 55.68 रुपयांवर गेली आहे.

 

आज शेअर बाजार खुला होताच रुपयानं 55.88ची निचांकी पातळी गाठली. त्यानंतर रुपया थोडासा सावरत 55.68पर्यंत सावरला. रुपयाची घसरण रोखण्यासाठी तातडीचे उपाय योजत काल रिझर्व्ह बँकेनं बाजारात 12 हजार कोटी रुपये ओतण्याचा निर्णय घेतलाय. आठवड्याभरात याची अंमलबजावणी करण्यात येईल.

 

मात्र या घोषणेचा रुपयाच्या घसरणीवर कुठलाही परिणाम झाला नसल्याचं दिसून येतंय.  त्यामुळं रुपयाची सातत्यानं होणारी घसरण रोखण्याचं मोठ आव्हान सरकार आणि रिझर्व बॅकेसमोर उभं आहे. रुपयाच्या घसरणीचा मोठा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असून घरणारा रुपयाचा महागाईवर परिणाम होणार आहे.

First Published: Wednesday, May 23, 2012 - 12:50
comments powered by Disqus