लोकसभेचे कामकाज स्थगित

संसदेचे आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले. मात्र, काही मिनिटातच ते स्थगित करण्यात आले आहे. या अधिवेशनात आसाममधील हिंसाचाराचे पडसाद उमटले.

Updated: Aug 8, 2012, 11:42 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

संसदेचे आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले. मात्र, काही मिनिटातच लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे. या अधिवेशनात आसाममधील हिंसाचाराचे पडसाद उमटले. भाजपने आक्रमक पवित्रा घेत सरकारला धारेवर धरले. गोंधळामुळे अधिवेशन स्थगित करण्यात आहे.

 

या अधिवेशनात महागाई आणि दुष्काळाचा प्रश्नावर गरम चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकार चांगलेच कोंडीत सापडण्याची शक्यता आहे. तर आसाममधीर हिंसाचाराप्रकरणी भाजप स्थगन प्रस्ताव मांडला गेला. तसेच या प्रश्नी राज्यसभेमध्ये वादळ उठण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार काय उत्तर देणार याची उत्सुकता लागून पाहिली आहे. हे अधिवेशन १२ वाजेर्यंत स्थगित केले गेले आहे.