वऱ्हाडाच्या गाडीला अपघात, ११ ठार

Last Updated: Sunday, April 15, 2012 - 13:57

www.24taas.com, बेळगाव

 

बेळगावमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २४ जण जखमी झाले आहेत. अपघातात मृत पावलेले सर्वजण सोलापूरचे रहिवासी आहेत. वऱ्हाडाचा हा ट्रक सोलापूरहून बेळगावला जात असताना सालोळी गावाजवळ हा अपघात झाला.

 

चालकाचा ट्रकवर असलेला ताबा सुटला आणि रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरला ट्रक धडकून पलटी झाला. बागलकोट आणि बेळगाव जिल्ह्याच्या सीमेवरील यरगट्टी इथे पहाटे ५. ३० वाजता अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की, त्यात  जवळ जवळ ११ जणांचा मृत्यू झाला.

 

लग्नासाठी निघालेलं वऱ्हाड ह्या गाडीत होते. लग्नाचा मुहर्त गाठण्यासाठी निघालेल्या या दुर्दैवी लोकांवर काळाने झडप घातली. या अपघातात २४ जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत .

 

 

 

 

First Published: Sunday, April 15, 2012 - 13:57
comments powered by Disqus