शरद पवार भेटणार सोनिया गांधींना!

केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्या चर्चा करणार आहे. राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार निश्चितीबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Updated: Apr 25, 2012, 04:34 PM IST

www.24taas.com, मुंबई

केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्या चर्चा करणार आहे. राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार निश्चितीबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

सध्या देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. तसेच देशातील परिस्थिती पाहता मध्यावधी निवडणुका होतील की काय अशी स्थिती आहे. संस्थेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पाही सध्या सुरू झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सोनिया गांधी आणि शरद पवार यांची भेट होणार आहे.

राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरविताना युपीएच्या सर्व पक्षांना विश्वासात घ्यावे, असे शरद पवार यांनी या पूर्वी स्पष्ट केले आहे. त्यामुळे हेच सांगण्यासाठी आज पवार सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे.

येत्या १६ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दिल्ली शेतकऱ्याचे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. खताच्या किंमती, निर्यात धोरण आणि शेतमालाच्या मिळणार भाव या संदर्भात हे आंदोलन होणार आहे. त्या संदर्भातही युपीएकडून सकारात्मक विचार व्हावा, अशीही पवार यांची अपेक्षा आहे. त्यामुळे ते या भेटी सोनिया गांधींना हा विषय सांगण्याची शक्यता आहे.

.