शाहिद बलवालाही जामिन मंजूर

Last Updated: Tuesday, November 29, 2011 - 16:56

झी २४ तास वेब टीम, पटियाला

 

२ जी घोटाळ्यात कनिमोळी पाठोपाठ स्वान टेलिकॉमचे प्रमोटर शाहिद बलवा यांनाही कोर्टानं दिलासा दिलाय. प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यामुळे गेल्या ६ महिन्यांपासून तिहार जेलच्या मुक्कामी असणाऱ्या शाहिद बलवांना पटियाला कोर्टानं जामिन मंजूर केलाय. बलवांची चौकशी पूर्ण झाली असल्यानं सीबीआयने त्यांच्या जामिन अर्जाला विरोध केला नाही. अखेर ५ लाखांच्या जातमुचलक्यावर बलवांना जामिन मंजूर करण्यात आलाय. २ जी घोटाळ्यात आता जवळपास सर्वच बड्या धेंडांना जामीन मंजूर झालाय. त्यामुळे आता ए. राजांना सुद्धा जामीन मिळण्याची शक्यता निर्माण झालीये.

First Published: Tuesday, November 29, 2011 - 16:56
comments powered by Disqus