सचिनला घ्यायचीय गुपचूप शपथ

सचिननं आपला राज्यसभेच्या खासदारकीचा शपथविधी मीडियापासून दूर ठेवावा, अशी विनंती राज्यसभेच्या सचिवालयाला केल्याचं समजतंय

Updated: May 18, 2012, 02:49 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

सचिननं आपला राज्यसभेच्या खासदारकीचा शपथविधी मीडियापासून दूर ठेवावा, अशी विनंती राज्यसभेच्या सचिवालयाला केल्याचं समजतंय. संसदेचं अधिवेशन जेव्हा सुरु नसतं तेव्हा सभापतींच्या दालनात सदस्याला थपथ देण्याची तरतूद आहे.

 

रेखानं खासदारकी थपथ घेताना मीडियानं जो फोकस केला तो टाळण्यासाठी सचिननं ही विनंती केली असावी, असं मानलं जातंय. सभागृहात येऊन थपथ घेण्याऐवजी खाजगीत शपथ घेता येईल काय? अशी विचारणा सचिननं केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. प्रथेनुसार, अधिवेशन सुरु असताना नव्या सदस्यांना सभागृहात थपथ दिली जाते. सध्या सुरु असलेलं संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मंगळवारी संपतंय. त्यामुळं जर सभापतींच्या दालनात सचिनला थपथ घ्यायची असेल तर अधिवेशन संपण्याची वाट पहावी लागेल. मात्र, नव्या सदस्यांनी थपथ घेण्याबाबत कुठलाही नियम नसल्याचे संसदीय कामकाज मंत्रालयातल्या सूत्रांनी सांगितलं आहे.