सरकारी बँकांमध्ये ५६ हजार नोकरभरती

येत्या सहा महिन्यात सरकारी बँका सुमारे ५६,५०० जणांना नोकरी देणार असल्याचे गुड न्यूज समोर आली आहे. गेल्या दहा वर्षातील ही सरकारी बँकांमध्ये सर्वात मोठी नोकर भरती असल्याचे म्हटले जात आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 19, 2013, 01:31 PM IST

www.24taas.com, कोलकत्ता
येत्या सहा महिन्यात सरकारी बँका सुमारे ५६,५०० जणांना नोकरी देणार असल्याचे गुड न्यूज समोर आली आहे. गेल्या दहा वर्षातील ही सरकारी बँकांमध्ये सर्वात मोठी नोकर भरती असल्याचे म्हटले जात आहे.
रिझर्व बँकेने नवे बँकिंग लायसन्स दिल्यानंतर बँकांमध्ये स्पर्धा वाढली असून त्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात नोकर भरती करण्यात येणार आहे.
देशातील सर्वात मोठ्या १२ हून अधिक बँकांना सुमारे ३० टक्के भरती करणार आहेत. यामुळे बँकिंग क्षेत्रातील बिझनेस इन्व्हायरमेंटर अधिक चांगले होणार असल्याचे मत बहुतांशी बँकांनी केले आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने दिलेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडियाला वगळता २० सरकारी बँका २२,४१५ अधिकारी आणि ३२,४३५६ क्लार्कची भरती करणार आहे. बँकांचे विस्तारीकरण आणि निवृत्ती झालेल्यांच्या जागेवर ही भरती करण्यात येणार आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडिया १५०० अधिकाऱ्यांची भरती करणार आहे.
पीपल अँड ऑर्गनायझेशनचे एन. एस. राजनने सांगितले की, सरकारी बँका ग्रामीण भागात विस्तारीकरणाची योजना आखत आहेत. त्यामुळे नुकतेच पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना नोकरीची संधी अधिक आहे. या बँका ग्राहकांवर लक्ष केंद्रीय करून ही भरती करणार आहे. बँकांकडे तंत्रज्ञान आहे, परंतु ह्युमन रिसोर्समध्ये बदल करण्याची बँकांची इच्छा आहे.
१०८० ते १९९० च्या दशकात सरकारी बँकांमध्ये नोकरीचे क्रेझ होते. पण ते नंतर कमी झाले. या काळात सरकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे बँकांतील भरती प्रक्रिया बंद केली होती. तसेच निवृत्त झालेल्यांच्या जागी नवीन भरतीही थांबविण्यात आली होती. २०१२ मध्ये सरकारी बँकांचा एकूण पगारावरील खर्च १७.५ टक्क्यांवरून १३.७२ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. याचे प्रमुख कारण मोठ्या प्रमाणात झालेली निवृत्ती हा होता.