सोन्याचं सामान्यांना आव्हान

Last Updated: Thursday, June 7, 2012 - 17:17

 www.24taas.com, नवी दिल्ली

 

जागतिक बाजारपेठ नवे नवे उच्चांक स्थापन करत असतानाच सोन्यानंही आत्तापर्यंतचा नवा उच्चांक प्रस्थापित केलाय. आज सराफा बाजार उघडताच सोन्यानं २०० रुपयांची उसळी घेत १० ग्रॅमसाठी ३०,४०० रुपयांचा नवा रेकॉर्डच बनवून एकप्रकारे सामान्यांना आव्हानच दिलंय.

 

इंडस्ट्रीयल युनिट्स आणि सोन्याचे कॉइन्सची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. साहजिकच चांदीनंही १२०० रुपयांची उसळी घेत ५५,५०० रुपये प्रतिकिलो असा दर प्रस्थापित केलाय. सुत्रांच्या म्हणण्याप्रमाणे, डॉलरचा भाव घसरल्यानं लंडनमध्ये सोन्याचा भाव सतत वाढतोच आहे. साहजिकच त्याचा परिणाम स्थानिक बाजारांवरही दिसून येतोय. लंडनमध्ये सोन्याचा सध्याचा भाव आहे १६३७.४० डॉलर तर चांदीचा भाव आहे २९.३१ डॉलर प्रति औस.

 

सध्या विवाहांचा सीझन असल्यानं स्टॉकर्सनं पहिल्यांदाच सोनं खरेदीवर जोर दिलाय. त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे भाव चढत गेलेले दिसतात. पण, यामुळे सोनं खरेदी करताना सामान्यांच्या तोंडला फेस येणार, हे नक्की.

 

.First Published: Thursday, June 7, 2012 - 17:17


comments powered by Disqus