LBT वरून काँग्रेसमध्येच फूट Congress on LBT

LBT वरून काँग्रेसमध्येच फूट

LBT वरून काँग्रेसमध्येच फूट
www.24taas.com, झ मीडिया, मुंबई

एलबीटीच्या प्रश्नावरुन राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता स्वपक्षीयांनीही काँग्रेसला घेरलंय. एलबीटी लागू करण्यावर मुख्यमंत्री ठाम असताना काँग्रेस खासदारांनी एलबीटीला विरोध दर्शवत थेट दिल्लीला जाऊन हायकमांडकडे धाव घेतली आहे.

काँग्रेस खासदार विलास मुत्तेमवार आणि गुरुदास कामत यांनी एलबीटीप्रश्नावरुन दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेऊन त्यांना या प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी केली. काँग्रेसच्या अठरा खासदारांच्या सहीचं पत्र सोनिया गांधींना दिलं असून आपला मुख्यमंत्र्यांविरोधात नाराजी नसल्याचं म्हटलंय. अनेक शहरांमध्ये निदर्शनं करत व्यापा-यांनी एलबीटीला विरोध दर्शवला आहे. ज्याचा फटका सर्वसामान्यांना बसतोय.

मात्र मुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका घेत एलबीटी लागू होणारच असं सांगितलंय. मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी त्यांच्याच पक्षातील खासदार नसल्याने एलबीटी मुद्दावरुन काँग्रेस पक्षातच फूट पडल्याचं दिसून येतंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, May 09, 2013, 22:28


comments powered by Disqus