पोलिसाच्या मुलानेच बापासमोर केला गँग रेप

Last Updated: Friday, July 6, 2012 - 14:06

www.24taas.com, औरंगाबाद

 

औरंगाबादमध्ये झालेला गॅंगरेप हा खुद्द पोलिसाच्या मुलानेच केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवृत्त पोलीस अधिकाऱ्यासमोर औरंगाबादच्या आश्रमातल्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादाय खुलासा झालाय.  निवृत्त डीवायएसपी शर्मा यांचा मुलगा किशोर यानं आणि त्याच्या ३ मित्रांनी बलात्कार केल्याचं माहितीतून उघडं झालय.

 

पोलिसांनी किशोर शर्माला अटक केली आहे. धक्कादायक बाबम्हणजे निवृत्त पोलीस अधिकाऱ्यासमोरच बलात्कार करण्यात आला.  औरंगाबादमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली होती. बुधवार रात्रीपासून दोन मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यातल्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं उघड झालं आहे. छावणी परिसरातल्या ख्रिश्चन मिशनरीच्या विद्यादीप आश्रमातून दोन मुली गायब झाल्या होत्या दोन्ही मुली अल्पवयीन होत्या.

 

त्यापैकी एका मुलीवर गँगरेप झाल्याचे उघड झाले आहे याप्रकऱणी ६ जणांना औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यांत ४ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. या मुली बुधवारी पहाटेपासून आश्रमातून गायब होत्या. पोलीस या मुलींचा शोध घेत असतांना, एक मुलगी त्यांना सापडली. मात्र, दुसऱ्या मुलीवर गँगरेप झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला..

 

 

 

First Published: Friday, July 6, 2012 - 14:06
comments powered by Disqus