'माणिकराव ठाकरे, विजय दर्डा पक्षाला कलंक'

Last Updated: Saturday, February 4, 2012 - 12:11

www.24taas.com , यवतमाळ

 

 

ज्येष्ठ विदर्भवादी नेते आणि माजी खासदार जांबुतराव धोटे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि खासदार विजय दर्डा यांच्यावर आरोप केलेत. हे दोन्ही नेते पक्षाला कलंक असून पक्षाच्या नावाचा गैरवापर करुन अब्जावधींची संपत्ती जमवल्याचा घणाघाती आरोप धोटे यांनी केला. यवतमाळमध्ये बोलताना जांबुतराव धोटे यांनी हा आरोप केला.

 

 

जांबुतराव धोटे म्हणालेत,  सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी या दोघांची दुकानं उघडलेली आहेत. हे दोघे धंद्यावर बसलेले आहेत. यांचे भाव वधारलेले आहेत. फक्त तिजोरी भरण्यासाठी हे प्रयत्न करीत आहेत. यांना सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसेच देणेघेणे नाही. यांची चागलेली दुकानदारी ही स्वत:साठी आहे. आम्ही मात्र प्रयत्न करायचे आणि हे दुकानदारी करणार. माणिकराव  ठाकरे, विजय दर्डा हे पक्षासाठी कलंक आहेत. यांच्या मालमत्तेची चौकशी केली पाहिजे, अशी माझी मागणी आहे.

 

 

केवळ चौकशी नको तर ठाकरे, दर्डांच्या मालमत्तेची सीबीआय चौकशी  झाली पाहिजे.  धोटे यांची कन्या क्रांती धोटे-राऊत यांना जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसनं उमेदवारी नाकारली. त्यामुळे माणिकरावांवर टीका करत क्रांती यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी जाहीर सभा घेण्यात आली होती. या सभेत हे गंभीर आरोप करताना जोरदार टीका केली. यामुळे यवतमाळमध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे.

 

 

जांबुतराव धोटे काय म्हणालेत... पाहा व्हिडिओ 

 

[jwplayer mediaid="41484"]

 

 

First Published: Saturday, February 4, 2012 - 12:11
comments powered by Disqus