रेल्वे मारहाण, राज ठाकरेंना जामीन मंजूर

Last Updated: Tuesday, July 10, 2012 - 14:37

www.24taas.com, अंबेजोगाई

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मंगळवारी अंबेजोगाई न्यायालया समोर हजर करण्यात आले. आज पंधरा हजार रूपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर राज ठाकरे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे .

 

कल्याण रेल्वे स्थानकात ऑक्टोबर २००८ मध्ये रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या परप्रांतीय उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करतानाच त्यांना चिथावणी दिल्याप्रकरणी राज ठाकरे यांनाही यात सहआरोपी करण्यात आले होते. त्यांच्या मारहाणीचे महाराष्ट्रभर पडसाद उमटले होते. त्यामुळे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी राज ठाकरेंवर खटले दाखल करण्यात आले होते.

 

२००८ साली परप्रांतीयांच्या रेल्वे भरतीला मनसेकडून विरोधी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरून स्थानिक कार्यकर्ते आणि राज ठाकरेंविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. राज ठाकारे यांच्या विरूध्द बीड जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. राज यांना सोमवारी माजलगाव न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता.

 

 

 First Published: Tuesday, July 10, 2012 - 14:37


comments powered by Disqus