आपलं राष्ट्रगीत 'गिनीज बुकात'

ठाण्यात राष्ट्रगीताच्या समुहगानाचा विक्रम झाला आहे. ठाण्यामधील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर ७० हजार जणांनी एकाच वेळी राष्ट्रगीत म्हटले आहे.

Updated: Feb 25, 2012, 06:21 PM IST

www.24taas.com, ठाणे

 

ठाण्यात राष्ट्रगीताच्या समुहगानाचा विक्रम झाला आहे. ठाण्यामधील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर ७० हजार जणांनी एकाच वेळी राष्ट्रगीत म्हटले आहे. राष्ट्रगीताच्या शताब्दी वर्षानिमित्त हा अनोखा विक्रम नोंदवण्यात आला. 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये या विक्रमाची नोंद घेतली जाणार आहे.

 

यावेळी अनेक सेलिब्रिटींसह अनेक राजकीय नेतेही उपस्थित होते. यापूर्वी औरंगाबादलाही ५० हजार नागरिकांनी एकाचवेळी राष्ट्रगीत म्हटलं होतं. ठाण्यातही तसाच प्रयत्न करण्यात आला. पोलीस बॅण्डसह लेझीम, पिरॅमीडचा यांचा देखील समावेश या कार्यक्रमात करण्यात आला होता. कलादिग्दर्शक नितीन देसाई, पार्श्वगायक स्वप्निल बांदोडकर आणि बेला शेंडे यांचीही उपस्थिती ही या सोहळ्याला होती.

 

तर असाच एक प्रयोग मराठी अभिमान गीत गाण्यासाठी रत्नागिरीत करण्यात आला होता. १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी अभिमान गीताचे समहू गायन झाले होते. त्यामुळे आता राष्ट्रगीताचे समूह गायना दरम्यान ठाणेकरांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

 

[jwplayer mediaid="55313"]