बाप्पा महागले!

गणरायाच्या आगमनाची लगबग कोकणात जाणवू लागलीय. मात्र, दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईचं सावट गणपती बाप्पांच्या मूर्तींवरही पडणार असंच दिसतंय.

Updated: Jul 28, 2012, 11:24 AM IST

www.24taas.com, सिंधुदुर्ग

गणरायाच्या आगमनाची लगबग कोकणात जाणवू लागलीय. मात्र, दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईचं सावट गणपती बाप्पांच्या मूर्तींवरही पडणार असंच दिसतंय.

 

कोकणात सध्या सगळीकडेच गणेशमूर्ती शाळा गजबजू लागल्यात. भात शेतीच्या कामातून उसंत काढत मूर्तीकार गणेश मूर्तींची कामं करण्यात मग्न आहेत. सध्या जवळपास पन्नास टक्के मूर्तींची कामं पूर्ण झाली आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही महागाईचं सावट दिसतंय. पर्यायानं मूर्तीकारांबरोबरच गणेश भक्तांनाही याचा फटका सहन करावा लागणार आहे.

 

उर्वरित महाराष्ट्राला यावर्षी पावसानं दणका दिला असला तरी कोकणात मात्र समाधानकारक पाऊस पडलाय. मात्र, महागाईनं सर्वाचंच कंबरडं मोडल्यामुळे गणेश मूर्तींच्या वाढलेल्या किंमतीनं यावेळी गणेशोत्सवावरही संक्रांत येणार आहे.

 

.