'रन नवीमुंबई रन'

Last Updated: Sunday, February 5, 2012 - 20:48

www.24taas.com, नवी मुंबई

 

नवीमुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली नवी मुंबई महापौर मॅरेथॉन आज पार पडली. 'रन नवीमुंबई रन' या नावाने पामबीचवर ही स्पर्धा पार पडली. नवीमुंबई, मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यातल्या जवळपास चार हजार स्पर्धकांनी यांत सहभाग घेतला.

 

आठ वेगवेगळ्या वयोगटात ही मॅरेथॉन स्पर्धा भरवण्यात आली होती. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनीही यांत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

 

पुरुषांच्या खुल्या गटात  हर्षद म्हात्रे या स्पर्धकाने ४७ मिनिटांत अंतर पार करुन पहिला येण्याचा मान मिळवला. नवीमुंबईत पहिल्यादांच ही मॅरेथॉन भरवण्यात आली होती

 

 

First Published: Sunday, February 5, 2012 - 20:48
comments powered by Disqus