रायगड दरोडा : दिवेआगर ग्रामस्थांचा मोर्चा

Last Updated: Saturday, April 7, 2012 - 18:59

www.24taas.com, अलिबाग

 

 

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर इथल्या सुवर्ण गणेश मंदिरावर पडलेल्या दरोड्याला पंधरवडा उलटूनही पोलीस तपासात काहीच धागेदोरे न लागल्यानं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दिघीसागरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

 

 

दिवेआगर इथल्या सर्वपक्षीय ग्रामस्थांनी एकत्र येत हा विराट मोर्चा काढला. मोर्च्यामध्ये गावातील शेकडो महिलाही सहभागी झाल्या होत्या. पोलीस ठाण्यावर मोर्चा गेल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांना शांततेचे आवाहन करत पोलीस तपासातील प्रगतीबद्दल माहिती दिली. पोलिसांनी तपासावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.

 

 

आणखी संबंधित बातम्या

 

गणेशमूर्ती चोरी : ट्रस्टीच जबाबदार – गृहमंत्री

रायगड जिह्यातील दिवेआगारमधील सुवर्णगणेशमूर्तीच्या चोरीप्रकरणी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी मंदिराच्या ट्रस्टीवर टीकास्त्र सोडल आहे. मूर्तीच्या सुरक्षिततेची जबाबदारी ट्रस्टींवर होती. मात्र ट्रस्टींनी सुरक्षेच्या नियमांचं पालन केलं नाही, अस सांगत आर.आर. पाटील यांनी ट्रस्टींवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
.
—————————————————

सेनेने मूर्ती आणायला नको होती- मनसे

शिवसेना-भाजप आमदारांनी विधानसभेत गणपतीच मूर्ती आणायला नको होती. असं वक्तव्य मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी केलीय. राज्य सरकारनं सत्तेचा दुरुपयोग केला असून निलंबन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले तर आम्ही त्यांना मदत करु असेही ते म्हणाले.
.
—————————————————
 
First Published: Saturday, April 7, 2012 - 18:59
comments powered by Disqus