लोकल ट्रेनची मस्करी बेतली जीवावर

बदलापूर-वांगणी दरम्यान कर्जतकडे जाणा-या लोकलमधून पडून 4 तरुण जखमी झाले आहेत. याला कारणीभूत ठरली आहेत शेजारच्या लोकलमधील काही टारगट मुलांची टवाळखोरी.

Updated: Oct 8, 2011, 04:05 PM IST

झी 24 तास वेब टीम, बदलापूर

 

[caption id="attachment_1954" align="alignleft" width="300" caption="बदलापूर-वागंणी दरम्यानची घटना"][/caption]

लोकल ट्रेनमधून नेहमीच केली जाणारी मस्करी ही जीवावर बेतू शकते, असचं आज घडलं आहे. बदलापूर-वागंणी दरम्यान ही अशीच एक घटना घडली आहे.

 

बाजूने जाणा-या लोकलमधील काही मुलांनी त्यांना कानाखाली मारल्या. त्यावेळी लोकलमधून तोल गेल्याने हे चौघेजण लोकलमधून खाली पडले. प्रशांत गायकर, प्रशांत दळवी आणि नागमन बोडकर आणि दिनेश अशी लोकलमधून पडून जखमी झालेल्या मुलांची नावं आहेत. या चौघांनाही सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.