किरण बेदी यांच्या विमानाच्या इंजिनात बिघाड

नागपूर जेटलाईट विमानाचे इमर्जन्सी लॅंडिंग, रांची-मुंबई विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. रांची-मुंबई विमानातील सर्व प्रवासी हे सुखरूप आहेत. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.

Updated: Nov 13, 2011, 06:13 AM IST

झी २४ तास वेब टीम, नागपूर

 

नागपूर जेटलाईट विमानाचे इमर्जन्सी लॅंडिंग, रांची-मुंबई विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. रांची-मुंबई विमानातील सर्व प्रवासी हे सुखरूप आहेत. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.

 

प्रवाशांमध्ये किरण बेदी याचांदेखील समावेश होता. किरण बेदी आणि सारे प्रवासी सुखरूप असल्याचे समजते. किरण बेदी रांचीहून मुंबईला येत होत्या याच विमानात बिघाड झाल्याने विमान लगेचच नागपूर विमानतळावर लॅंड करण्यात आलं.यानंतर सारे प्रवासी आणि किरण बेदी अजूनही विमानतळावरच असल्याचे समजते. दुसऱ्या विमानाच्या प्रतिक्षेत प्रवासी आणि किरण बेदी या विमानतळावरच थांबल्या आहेत.