नागपूरमध्ये घातक भेसळयुक्त मध

नागपूरमध्ये भेसळयुक्त मध जप्त करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. हे भेसळयुक्त मध शरिराला घातक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे नागपूरकर धास्तावले आहेत.

Updated: Mar 3, 2012, 10:07 PM IST

अखिलेश हळवे, www.24taas.com, नागपूर

 

नागपूरमध्ये भेसळयुक्त मध जप्त करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. हे भेसळयुक्त मध शरिराला घातक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे नागपूरकर धास्तावले आहेत.

 

बाजारात सध्या भेसळयुक्त मध विकला जात आहे. वाडी भागतल्या बालाजी डिस्ट्रीब्युटर्सच्या गोदामावर छापा टाकून हा बनावट मध जप्त करण्यात आलाय. हिमाचल प्रदेशातल्या 'विंग्ज' कंपनीचा मध बनावट असल्याची माहिती FDA ला मिळाली होती. त्यावरून ही धाड टाकण्यात आली आहे.

 

गोठलेल्या अवस्थेत सापडलेला हा मध शरिराला घातक असल्याचं डॉक्टर सांगत आहेत. या नकली मधामुळे पोटावर आणि शरीरावर घातक परिणाम होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. यामुळे नागपुरातील नागरिक धास्तावले आहेत.

 

भेसळीचे वाढते प्रकार आणि त्यातून उद्भवणाऱ्या घटना पाहता अन्न आणि औषध प्रशासन तसंच पोलिसांनीही वेळीच कडक पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.