ऐश्र्वर्य पाटेकर साहित्य अकादमीने सन्मानित

नाशिकच्या ऐशवर्य पाटेकर यांना साहित्य अकादमीचा २०११ सालचा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. पाटेकर यांच्या २०११ साली प्रकाशीत झालेल्या भुईशास्त्र या काव्यसंग्रहासाठी अकादमी पुरस्कार देण्यात आला आहे. ऐशवर्य पाटेकर हे निफाड तालुक्यातील काकासाहेबनगर इथे असलेल्या काकासाहेब वाघ महाविद्यालयात व्याखाता आहेत.

Updated: Feb 15, 2012, 11:45 AM IST

www.24taas.com, नाशिक

 

जमात

हिर्वी पीके नष्ट करणाऱ्या बैलांची एक जमात

नुकतीच झाली आहे डेरेदाखल

देशी वाण नावालाही शिल्लक ठेवायचा नाही; असा मनसुबा

आणि हिर्वी पीके चरत जाण्याचा चंगच त्यांनी बांधला आहे !

अस्सल वाणाचं सकस बियाणं मडक्या गाडग्यात

घालून; मातीखाली पुरुन ठेवा

अन्यथा, आपल्या कृषीसंस्कृतीची मूळंच

नामशेष होतील...

असे वास्तव परिस्थितीवर ताकदीने भाष्य करत आसूड ओढणाऱ्या, आणि सावधानतेचा इशारा देणाऱ्या ऐश्र्वर्य पाटेकरांच्या कवितेला साहित्य अकादमीने सन्मानित करण्यात आलं आहे.

 

नाशिकच्या ऐशवर्य पाटेकर यांना साहित्य अकादमीचा २०११ सालचा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. पाटेकर यांच्या २०११ साली प्रकाशित झालेल्या भुईशास्त्र या काव्यसंग्रहासाठी अकादमी पुरस्कार देण्यात आला आहे.  ऐशवर्य पाटेकर हे निफाड तालुक्यातील काकासाहेबनगर इथे असलेल्या काकासाहेब वाघ महाविद्यालयात व्याखाता आहेत.

 

पुस्तकाच्या बर्ल्बवर डॉ.रमेश वरखेडेंनी पाटेकरांच्या कवितेबद्दल, ‘ ऐश्र्वर्य पाटेकरांच्या कवितेने मराठी कविता प्रगत झाली आहे. त्यांची कविता संवादी आणि रसिक वाचकांशी थेट बोलणारी आहे. सात्विक आणि स्वाभाविकपणाची लक्षणे कवितेत येणे वेगळेपणचे आहे. खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या आजच्या युगात ऐश्र्वर्य पाटेकर यांची कविता स्वत:शी संवाद करता जनसंवादी होते. ती वर्तमानावर असूड ओढल्यासारखी भाषा करत असली तरी तिची नाळ संतांच्या परंपरेशी घट्ट जोडलेली आहे.’ असं लिहिलं आहेल ते किती समर्पक आहे ते कविता वाचताना जाणवतं.

 

-