अफू शेतीची चौकशी - पोलीस महानिरीक्षक

Last Updated: Thursday, March 1, 2012 - 13:13

www.24taas.com,  सांगली

 

 

सांगली जिल्ह्यातील अफू लागवडीची पोलीस चौकशी होणार आहे. कोल्हापूरचे पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी ही माहिती दिली.

 

 

शिराळा तालुक्यात 3 वर्षांपासून अफूची लागवड होत असल्याची माहिती त्यांनी दिलीये. अफू लागवड झालेल्या जमिनीच्या सातबारावर झालेल्य़ा नोंदीचीही तपासणी होणार आहे. अफूच्या लागवडीस जबाबदार असलेल्या सगळ्यांवर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिलेत.

 

 

बीड अफू लागवड प्रकरणीही  स्थानिक तलाठ्याला निलंबित करण्यात आलयं. तर मंडळ अधिका-याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीये. त्यामुळं कोल्हापूर सांगली भागातल्या अफू लागवड करणा-यांवर अशा स्वरुपाची किंवा त्याहीपेक्षा कडक कारवाई करण्याची शक्यता आहे.

First Published: Thursday, March 1, 2012 - 13:13
comments powered by Disqus