दुष्काळ : राहुल यांचे गुळगुळीत आश्वासन

सातारा दौ-यावर असलेल्या राहुल गांधींनी माण खटाव तालुक्यातल्या जासी गावाला भेट दिली. यावेळी जासी गावच्या सरपंच मिनाक्षी पवार यांनी राहुल गांधी यांच्यासमोर गावक-यांची व्यथा मांडली. तर आम्हाला पैसे नको, कायचं पुरेसं पाणी द्या...अशी व्यथा जासी गावच्या ग्रामस्थांनी राहुल गांधींसमोर मांडली. ग्रामस्थांना आश्वासन देताना राहुल म्हणाले, केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार आहे. दुष्काळ भागातील प्रश्न सोडविण्यात येतील. मी दिल्लीत गेल्यावर याप्रश्नी लक्ष घालीन.

Updated: Apr 28, 2012, 01:49 PM IST

www.24taas.com, माण

सातारा दौ-यावर असलेल्या राहुल गांधींनी माण खटाव तालुक्यातल्या जासी गावाला भेट दिली. यावेळी जासी गावच्या सरपंच मिनाक्षी पवार यांनी राहुल  गांधी यांच्यासमोर गावक-यांची व्यथा मांडली. तर आम्हाला पैसे नको, कायचं पुरेसं पाणी द्या...अशी व्यथा जासी गावच्या ग्रामस्थांनी राहुल  गांधींसमोर मांडली. ग्रामस्थांना आश्वासन देताना राहुल म्हणाले, केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार आहे. दुष्काळ भागातील प्रश्न सोडविण्यात येतील. मी दिल्लीत गेल्यावर याप्रश्नी लक्ष घालीन.

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी सातारा दौ-यावर असलेल्या राहुल गांधींनी माण तालुक्यातल्या जासी गावाला भेट दिली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हेही यावेळी त्यांच्याबरोबर होते. जासी ग्रामस्थांनी राहुल गांधींवर प्रश्नांचा भडिमार केला. आम्हाला पैसे नको, कायमचं पाणी द्या, अशी मागणी करत ग्रामस्थांनी पाणीटंचाईच्या झळा बसत असल्याची व्यथा मांडली. राहुल गांधींसमोर गावक-यांनी समस्यांचा पाढाच वाचला. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही गुळगुळीत आश्वासन दिले. राहुल गांधी महाराष्ट्राला मदत देण्यासाठी प्रयत्न करतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कधीही न आटणारे तलाव आता कोरडे पडू लागलेत. त्यामुळं गावाला भीषण पाणीटंचाईला सामोरं जावं लागतंय. दुष्काळावर उपाययोजनांसाठी केंद्रातून निधी मिळावा, यासाठीच राहुल गांधींना या भागाची पाहणी करण्यासाठी इथं आणल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केंद्रातून लवकरच निधी मिळेल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. जास ग्रामस्थांच्या समस्या ऐकूण घेतल्यानंतर राहुल गांधी बिजवडीला रवाना झाले.  त्यानी डाळिबांच्या बागांची पाहणीही केली. राहुलनी अडीच तास दुष्काळाची परिस्थिती जाणून घेतली. यावेळी संरक्षण कडे तोडून ग्रामस्थांशी त्यांनी चर्चा केली.