पुण्यामध्ये कानडी आंबे !

Last Updated: Wednesday, January 11, 2012 - 23:58

www.24taas.com, पुणे

 

फळांचा राजा असलेल्या आंब्याचं पुण्यात आगमन झालं आहे. मात्र हा आंबा राज्यातला नाही तर कर्नाटकातला आहे.

 

पुण्याच्या छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात कर्नाटकच्या हापूस आंब्याची आवक झाली आहे. हंगामापूर्वी दोन महिने आधीच या हापूसचं आगमन झाल्यानं तो कुतुहलाचा विषय ठरला आहे. कर्नाटकच्या ईर्शाद पाशा यांच्या बागेतून सात पेट्यांची पुण्याची आवक पुण्याच्या मार्केटमध्ये झाली आहे. या आंब्यांच्या पाच डझनच्या एका पेटीचा भाव जवळजवळ ११०० रूपये इतका आहे.

 

दुसरीकडे कोकणवासीय मात्र हापूसच्या प्रतीक्षेत आहेत. थंडीमुळे आंब्याला अद्याप मोहोरच आलेला नाही. त्यामुळे कोकणात आंब्याचं उत्पादन लांबणीवर पडलं आहे. कोकणातलं मिनी महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या दापोलीमध्ये पारा साडेसात अंशांपर्यंत खाली घसरला आहे. फलधारणेसाठी ही थंडी पोषक असली, तर सलग मुक्कामाला आलेली थंडी आंब्यासाठी घातक ठरणारी आहे. जोपर्यंत थंडी ओसरत नाही, तोपर्यंत आंब्याच्या फलधारणेची पुढची नैसर्गिक प्रक्रिया सुरू होत नाही.

 

त्यामुळं यंदाच्या गुलाबी थंडीमुळं कोकणातले पर्यटक सुखावले असले, तरी आंबा बागायतदारांना चांगलीच  हुडहुडी भरली आहे.

 

[jwplayer mediaid="27745"]

 

 

First Published: Wednesday, January 11, 2012 - 23:58
comments powered by Disqus