प्राध्यपकाविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील प्राध्यपकाविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार करण्यात आली आहे.

Updated: Jan 11, 2012, 09:54 PM IST

www.24taas.com, कोल्हापूर

 

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील प्राध्यपकाविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार करण्यात आली आहे.

 

विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक ए.व्ही.राव यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला आहे. पी.एच.डी सादर केलेल्या मुलीनेच ही तक्रार कुलगुरूंकडे केली आहे. पी.एच.डीचा प्रबंध हा याच प्राध्यापक .व्ही राव यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आला होता. वेगवेगळ्या कारणांच्या निमित्ताने कार्यालयात बोलवून लगट केल्याचा आरोपही या मुलीने केला.

 

विभागप्रमुखांकडून अहवाल मागविल्यानंतर प्रा.ए.व्ही राव यांना निलंबित करण्यात आलंय.