महालक्ष्मी मंदिरात दानपेटी बसवण्यावरुन वाद

Last Updated: Sunday, April 1, 2012 - 15:47

  www.24taas.com, कोल्हापूर

 

करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीच्या मंदीरात दानपेटी बसवण्यावरून वाद निर्माण झालाय. यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अधिकारी आणि पुजारी आमनेसामने उभे ठाकलेत

 

महालक्ष्मी मंदिरातल्या दानपेटीवरून देवस्थान समिती आणि पुजा-यांमधले वाद नवीन नाहीत. देवस्थान समितीनं जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांच्या उपस्थितीत मंदिरात दोन दानपेट्या बसवल्या. पण एका दानपेटीला पुजा-यांचा विरोध आहे. दानपेटीमुळे गाभा-यात जातांना, पूजा करताना अडचणी येता. त्यामुळं दानपेटीला कायम विरोध राहणार असं पुजारी सांगतायत. पुजा-यांची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळल्यामुळंच दानपेटी बसवल्याचं देवस्थान समितीच्या अधिका-यांनी सांगितलंय.

 

उंब-याच्या आत दिल्या जाणा-या वस्तुंवर पुजा-यांचा अधिकार असणार. तर उंब-या बाहेर देवस्थान समितीचा अधिकार... यावरुनही समिती आणि पुजा-यांमध्ये वाद झालेत. दानपेटी उंब-याबाहेर, त्यामुळं त्यातल्या वस्तुंवर समितीचा अधिकार असणार त्यामुळं पुजारी विरोधी भुमिका घेतायत असं समितीच्या अधिका-यांचं म्हणणं आहे. वेळ प्रसंगी आंदोलन आणि पुन्हा न्यायालयात जाण्याची तयारीही पुजा-यांनी ठेवलीय.

 

 

First Published: Sunday, April 1, 2012 - 15:47
comments powered by Disqus