सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नवी प्रथा

सामुदायिक विवाह सोहळे अनेक ठिकाणी पार पडतात. पण पिंपरी-चिंचवडमध्ये नुकताच एक अनोखा सामुदायिक विवाहसोहळा पार पडला. काय होतं या विवाहसोहळ्याचं वैशिष्ट्य.

Updated: Nov 7, 2011, 04:49 PM IST

झी २४ तास वेब टीम, पिंपरी-चिंचवड

सामुदायिक विवाह सोहळे अनेक ठिकाणी पार पडतात. पण पिंपरी-चिंचवडमध्ये नुकताच एक अनोखा सामुदायिक विवाहसोहळा पार पडला. काय होतं या विवाहसोहळ्याचं वैशिष्ट्य.

एडस या रोगावर आजही खुलेपणानं चर्चा केली जात नाही. पण पिंपरी-चिंचवडच्या सारथी इंटरनॅशनल फाऊण्डेशनच्या वतीनं एक धाडसी पाऊल उचललं. या संस्थेनं सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या वधू वरांच्या आधी एचआयव्ही चाचण्या घेतल्या आणि मगच हे विवाहसोहळे संपन्न झाले.

या सोहळ्यात सहभागी झालेल्या वधु वरांनीही या उपक्रमाचं स्वागत केलं.विवाह झाल्यानंतर एडससारख्या गंभीर चाचण्या करुन नंतर पश्चाताप करण्यात काहीच अर्थ नसतो. ही वस्तुस्थिती ओळखूनच सारथी फाऊण्डेशननं हे पाऊल उचललं. त्यांचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद...