सीसीटीव्ही बंद, स्फोटाचे आरोपी सापडणार कसे?

Last Updated: Thursday, August 2, 2012 - 14:22

www.24taas.com, पुणे

 

पुण्यातल्या स्फोटांनंतर एक धक्कादायक बाब समोर आलीय. स्फोट झालेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचं उघड झालंय. देना बँक आणि गरवारे परिसरातले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचं पुढं आलंय.

 

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटानंतर पुणेकरांच्या सुरक्षेसाठी महापालिकेन शहरात 70 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. मात्र या कॅमे-यांची नंतर देखबाल करण्यात कुचराई केल्याचं कालच्या घटनेनंतर उघड झालंय. मात्र याला वेगळ्या वादाचं स्वरूप आलंय. या सीसीटीव्हींचा खर्च कुणी करावा यावरून महापालिका पोलिसांमध्ये भांडण सुरू होते. आणि त्याच्यामुळे हे सर्व कॅमेरे बंद असल्याचं पुढं आलं  आहे....

 

पुण्यातील गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावर संध्याकाळी आठच्या सुमारास पाच ठिकाणी कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट झाले होते. गरवारे स्फोट, बालगंधर्व रंगमंदिर, मॅकडोनाल्ड आणि देना बॅंकेसमोर झालेले हे स्फोट कमी तीव्रतेचे असले तरी बॉम्बस्फोटच असून, यात एक जण जखमी झाला होता.

 

 

 

 

 

First Published: Thursday, August 2, 2012 - 14:22
comments powered by Disqus