ह्यांचा काही नेम नाही...

Last Updated: Tuesday, May 22, 2012 - 15:37

www.24taas.com, पिंपरी चिंचवड 

 

राजकारणी काय करतील याचा नेम नसतो. पिंपरी चिंचवडच्या नगरसेवकांचा असाच एक उपद्व्याप सुरु आहे. केवळ एका बिल्डरला खुश ठेवण्यासाठी एक अख्खा तलावच बुजवण्याचं काम सध्या इथं सुरू आहे.

 

सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी गुंतलेत ते वाकमधल्या सर्वे नंबर २११ मध्ये असलेला तलाव बुजवण्याच्या कामामध्ये. एका बिल्डरच्या हितासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे. या बिल्डरनं निवणुकीत राषट्रवादीच्या काही नगरसेवकांना मदत केली होती. ही त्याचीच परतफेड...

 

ही गोष्ट अजित पवारांच्या लक्षात येताच, त्यांनी नगरसेवकांना दम भरलाय. पण, दादांची पाठ वळल्यानंतर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ या उक्तीप्रमाणे महानगरपालिकेचं काम सुरूच राहिलं. दादांनी खरडपट्टी काढल्यानंतरही हा तलाव बुजवण्याचं काम अजून काही थांबविण्यात आलेलं नाही. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. बहुमताच्या जोरावर राष्ट्रवादीचे नगरसेवक वाट्टेल ते निर्णय घेतात, असा आरोप नेहमीच होतो. त्यामुळेच, अजितदादांची या बालेकिल्ल्यावर नेहमीच करडी नजर असते. आता तलावाच्या मुद्यावर अजित पवारांची तंबी कितपत लागू होतेय, ते पाहावं लागेल.

First Published: Tuesday, May 22, 2012 - 15:37
comments powered by Disqus