RTI कार्यकर्त्याची हत्या, पोलिसांची चौकशी

Last Updated: Wednesday, May 2, 2012 - 13:17

www.24taas.com, पुणे

 

पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्येप्रकरणी पोलीस संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. तत्कालीन पोलीस अधिकारी भाऊसाहेब अंधाळकर आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांची पॉलिग्राफ टेस्ट करण्याची मागणी सीबीआयनं शिवाजीनगर कोर्टाकडे केली आहे.

 

उद्योजक नितीन साबळे यांचीही पॉलिग्राफ टेस्ट करण्याची मागणी सीबीआयनं केली आहे. या मागणी शिवाजीनगर कोर्टात दुपारी सुनावणी होणार आहे. पोलीस आणि उद्योजकांची पॉलिग्राफ टेस्ट करण्याच्या सीबीआयच्या मागणीमुळे हे प्रकरण नवीन टप्प्यावर येऊन ठेपलं आहे.

 

७ पोलीस  कर्मचाऱ्यांची पॉलिग्राफ टेस्ट करण्यास परवानगी कोर्टाने मिळालेली आहे. RTI कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी आता पोलिसांवरच ठपका ठेवण्यात आला आहे.

 

 

 First Published: Wednesday, May 2, 2012 - 13:17


comments powered by Disqus