जीवेत शरदः शतम्

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज वाढदिवस.... बाळासाहेबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दरवर्षी त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी आणि शिवसेनाभवनावर जनसागर उसळतो..यावर्षी पालिका निवडणुकांवर महायुतीचा झेंडा फडकवून त्यांना वाढदिवसाची भेट देण्याचा शिवसैनिकांचा निर्धार आहे...

Updated: Jan 24, 2012, 04:10 PM IST

www.24taas.com,मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज वाढदिवस.... बाळासाहेबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दरवर्षी त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी आणि शिवसेनाभवनावर जनसागर उसळतो..यावर्षी पालिका निवडणुकांवर महायुतीचा झेंडा फडकवून त्यांना वाढदिवसाची भेट देण्याचा शिवसैनिकांचा निर्धार आहे...

शिवसेनाप्रमुखांचा वाढदिवस म्हणजे शिवसैनिकांसाठी आनंदाची पर्वणी असते. मोठ्या संख्येनं मातोश्रीवर हजेरी लावून शिवसैनिक बाळासाहेबांना शुभेच्छा देतात. यंदा आचारसंहिता असल्यानं बाळासाहेबांचा वाढदिवस साधेपणानं साजरा होणारयं. पोस्टर आणि बॅनर्सशिवाय शिवसैनिकांना बाळासाहेबांचा वाढदिवस साजरा करावा लागतोय. मात्र असं असलं तरी कार्यकर्त्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही.