बेळगावच्या महापौरांचा मराठी बाणा

Last Updated: Sunday, November 6, 2011 - 17:45

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

कर्नाटक सरकारची बेळगाव महापालिकेवर वक्रदृष्टी पडली. बेळगावच्या महापौर मंदा बाळेकुंद्री आणि उपमहापौर रेणू किल्लेदार यांना कर्नाटक सरकारने कारणे दाखवा नोटीस बजावली. काळ्या दिनाच्या कार्यक्रमात सहभागी प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे.

 

बेळगावच्या महापौर यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सदानंद गौडा यांची भेट घेतली. बेळगावच्या महापौरांनी नोटिशीला उत्तर देण्यास नकार देत महापालिका बरखास्त झाली तरी बेहत्तर असं बाणेदार उत्तर मुख्यमंत्र्यांना दिलं.First Published: Sunday, November 6, 2011 - 17:45


comments powered by Disqus