शनिवार ठरला घातवार, १५ ठार तर २८ जखमी

राज्यात विविध ठिकाणी झालेल्या सहा अपघातांमध्ये १५ जण ठार तर 2८ जखमी झालेत. त्यामुळे शनिवार घातवार ठरलाय. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वात मोठा अपघात सांगली जिल्ह्यात मिरज-पंढरपूर मार्गावरील घोरपडी फाट्यावर झाला. याठिकाणी ऊसाचा ट्रक आणि मारुती कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहाजण ठार झालेत.

Updated: Apr 7, 2012, 09:48 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

 

राज्यात विविध ठिकाणी झालेल्या सहा अपघातांमध्ये १५  जण ठार तर 2८ जखमी झालेत. त्यामुळे शनिवार घातवार ठरलाय. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

 

सर्वात मोठा अपघात सांगली जिल्ह्यात मिरज-पंढरपूर मार्गावरील घोरपडी फाट्यावर झाला. याठिकाणी ऊसाचा ट्रक आणि मारुती कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहाजण ठार झालेत. मृतांमध्ये 3 पुरुष, 2 महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील श्रीपूरचे गायकवाड कुटुंबिय जोतिबाच्या दर्शनाहून परतत असताना काळानं त्यांच्यावर घाला घातला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झालाय.  मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरही झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून आठ जण जखमी झालेत.

 

 

मुंबईकडून पुण्याकडे जाणारा टेम्पो कामशेत बोगद्याजवळ साईड बारला धडकून अपघात झालाय.  तिस-या घटनेत डहाणूजवळच्या चारोटी नाक्यावर सुमो आणि कंटेनरमधल्यात धडकेत एकाचा मृत्यू झालाय. तर चार जण गंभीर जखमी झालेत. कैलास विषे यांचा या अपघातात मृत्यू झालाय. हे सर्वजण  नालासोपा-याहून डहाणूच्या महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी सुमोने चालले होते. चारोटी नाक्यावर समोरच्या बाजूने येणा-या कंटेनरचा टायर फुटला आणि त्याची सुमोला धडक बसली. यामध्ये एका रिक्षालाही ठोकर लागली.

 

 

 

सोलापूर-हैदराबाद महामार्गावर झालेल्या ट्रक आणि टेम्पो अपघातात ३ जण ठार तर ३ जण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भिषण होता की दोन्ही गाड्यांचो चेंदामेंदा झाला आहे. अपघातातील तिघे जण  जागीच ठार झाले. तर जळगाव येथील अपघातत ३ ठार आणि पाच जण जखमी झालेत. हा अपघात ट्रक आणि रिक्षामध्ये झाला. ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने तिघे जण ठार झालेत. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

 

मुंबईत रात्री होणा-या अपघातांमध्ये शनिवारीही खंड पडला नाही. घाटकोपर परिसरातल्या भटवाडी मार्केटजवळ एका भरधाव वेगात असलेल्या मारूती झेन कारनं 8 जणांना जखमी केलं. वेगात असलेल्या या गाडीनं आधी रस्त्याच्या कडेला असलेल्या काही दुकानांना टक्कर दिली. त्यामुळं दुकानांजवळ उभ्या असलेल्या लोकांना या गाडीनं उडवलं. गाडी चालक हा नवशिक्या असल्याचं तपासात उघड झालं असलं तरी घटना घडल्यापासून तो फरार झालाय.