www.24taas.com, मुंबई मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने अंधेरी परिसरात सेक्स रॅकेट चालवणा-या चौकडीला ताब्यात घेतलंय. त्यामध्ये एक महिला आणि तिच्या दोन मुलांचा समावेश आहे.
अन्य दोन मुलींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. संबंधित महिला फोनवरुन सेक्स रॅकेट चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कारवाई दरम्यान पोलिसांनी 80 हजारांची रोकडही जप्त केली.
First Published: Thursday, May 17, 2012, 14:15