Zeenews logo
English   
Sunday, May 26, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

अशोकरावांना हाताची साथ, समर्थक तरीही नाराज

Monday, July 09, 2012, 14:45
Comments 0
 
टॅग्स::
www.24taas.com, मुंबई
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर अन्याय झाल्याचं काँग्रेसच्या बहुतांश आमदारांनी मान्य केलंय. तसंच अशोक चव्हाणांच्या मागे उभं राहण्याचं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी दिलंय.
 
कांग्रेस विधीमंडळ बैठकीत आमदारांनी मंत्र्यांविरोधात तक्रार करत, मतदारसंघात कामं होत नसल्याचा सूर लावला होता. याआधी अशोक चव्हाणांच्या समर्थक आमदारांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींकडे भेटीची वेळ मागितली होती.
 
चव्हाण समर्थकांनी विधीमंडळ पक्षाच्या बैठकीवर बहिष्कारही टाकला होता. काँग्रेस पक्ष अशोक चव्हाणांना वाचवू शकत नाही तर आमचं काय ? असा सवाल चव्हाण समर्थक आमदारांनी केला होता. या आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त करत. काँग्रेस आमदारांची कामेही होत नाहीत असा आरोप चव्हाण समर्थक आमदारांनी केलाय.

First Published: Monday, July 09, 2012, 20:16

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: