Zeenews logo
English   
Friday, May 24, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

मुंबईत दोन ठिकाणी अपघाताच्या घटना

www.24taas.com, मुंबई
 
मुंबईत एकाच रात्रीच अपघाताच्या दोन घटना घडल्या आहेत. वरळी सी फेसवर दोन कारमध्ये अपघात झाला आहे. तर मुंबई विमानतळ परिसरात एक भरधाव बस उलटली आहे. वरळी सी फेसवर पहाटे साडेतीनच्या सुमाराला दोन कारमध्ये अपघात झाला आहे.
 
होंडा सिविक आणि होंडा सिटी या दोन कार एकमेकांना धडकल्या. यात तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. एक कार दुसऱ्या कारला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. हा अपघात इतका भयानक होता की दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे.
 
तर दुसरीकडं मुंबई विमानतळ परिसरात एक भरधाव बस उलटली आहे. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या बसच्या चालकानं वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर एका तवेरा कारला धडक दिली.
 
 
 

First Published: Friday, March 02, 2012, 09:02

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: