Zeenews logo
English   
Saturday, May 25, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

मुंबई पूर्ण सुरक्षित नाही - पोलीस आयुक्त

Sunday, November 27, 2011, 07:07
Comments 0
 
झी 24 तास वेब टीम, मुंबई


26/11 च्या हल्ल्याला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतरही मुंबई पूर्ण सुरक्षित नसल्याचं समोर आलयं. मुंबई पोलिसांनी याची कबुली दिलीये. मुंबईच्या सागरी सीमा पूर्णःत सुरक्षित नसल्याचं मुंबईचे पोलीस आयुक्त आरुप पटनाईक यांनी म्हटलयं.
 
 


सागरी हद्दीच्या सुरक्षेसाठी 25 सागरी पोलीस ठाण्यांना कोट्यवधी रुपयांची सामुग्री देण्यात आली. मात्र अत्याधुनिक यंत्रणा हाताळण्यासाठी कुशल कर्मचारी नसल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलयं. सागरी सुरक्षेची तीन वर्षांपूर्वी जी स्थिती होती त्यापेक्षा आत्ताची स्थिती उत्तम असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलय.
 
 


सागरी सीमा सुरक्षित आहेत आणि पुन्हा दहशतवादी समुद्रमार्गे येत असतील तर त्यांना रोखता येईलच असं सांगता येणार नाही असं पटनायक म्हणाले. पोलिसच सागरी सुरक्षेची पूर्ण हमी देत नसल्यानं मुंबईकर दहशतीच्या छायेखाली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.


First Published: Sunday, November 27, 2011, 07:10

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: