राज ठाकरे चालले पायी!, raj thackeray not with balasaheb thackeray courtedge

राज ठाकरे चालले पायी!

राज ठाकरे चालले पायी!

www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अखेरच्या प्रवासामध्ये समस्त ठाकरे कुटुंबिय सहभागी झाले. परंतु, बाळासाहेबांचे पार्थिव असलेल्या रथामध्ये राज ठाकरे नव्हते. राज ठाकरे यांनी रथाऐवजी रथासमोर पायी चालण्याचा निर्णय घेतला. अंत्यायात्रा शिवसेना भवनाजवळ पोहोचली, त्यावेळी राज ठाकरे सी-लिंक मार्गे `कृष्णाकुंज`वर रवाना झाले. ते तेथूनच थेट शिवाजी पार्कवर येणार आहेत.

बाळासाहेबांची अंत्ययात्रा सकाळी 9 वाजताच्या सुमारास सुरु झाली. त्यापूर्वी राज ठाकरे मातोश्रीबाहेर पडले. त्यांनी सुरक्षा व्यवस्थेवचा आढावा घेतला. त्यानंतर काही मिनिटांनीच उद्धव ठाकरे बाहेर आले. त्यांच्यारपाठोपाठ ठाकरे कुटुंबियांचे निकटवर्तीय बाळासाहेबांचे पार्थिव खांद्यावर घेऊन आले. यानंतर राज ठाकरे रथावर दिसले नाही. उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी आणि रश्मी ठाकरे, पूत्र आदित्य, तेजस, राज ठाकरे यांची आई, राज यांच्या पत्नीत शर्मिला तसेच मुलगा अमित आणि मुलगी उर्वशी, उद्धव यांचे थोरले बंधू जयदेव इत्यादी निकटवर्तीय रथावर होते. राज ठाकरे त्यात नसल्याने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला, ते कुठे आहेत. परंतु, राज यांनी स्व तःच रथावर न जाण्याचा निर्णय घेतला.

सुत्रांनी दिलेल्यान माहितीनुसार, बाळासाहेबांची अंत्ययात्रा सुरु झाली त्यावेळी राज ठाकरे अतिशय भावूक झाले होते. परंतु, उगाच कोणीतरी राजकीय फायदा घेण्या‍चा प्रयत्नत केल्याचा आरोप करु नये, यासाठी ते रथावर गेले नाही. याऐवजी त्यांनी रथापुढे चालण्याचा मार्ग निवडला. एकूण अंत्यययात्रा, सुरक्षा व्यवस्था आणि इतर गोष्टींरकडे ते लक्ष देत आहेत. तसेच राज यांचे सहकारी शिवाजी पार्कवरील व्यरवस्थेकडे लक्ष ठेवून आहेत.

First Published: Sunday, November 18, 2012, 15:37


comments powered by Disqus