टाईमलाईन फेसबुक

सोशलनेट साईटवर तुम्हाला आता फेसबुकने अधिक स्मार्ट बनविले आहे. आपली प्रोफाईल छान दिसणार आहे. मात्र, त्यासाठी तुम्हाला टाईमलाईन पाळावी लागेल. म्हणजेच फेसबुकच्या तुमच्या प्रोफाईलला ‘टाईमलाईन’ टॅग करावे लागेल. ‘टाईमलाईन’ टॅग केला की मग पहा, तुमची प्रोफाईल हायटेक दिसेल आणि तुम्ही फेसबुकच्या प्रेमात पडाल.

Updated: Jan 5, 2012, 11:44 AM IST

www.24taas.com , मुंबई

सोशलनेट साईटवर तुम्हाला आता फेसबुकने अधिक स्मार्ट बनविले आहे. आपली प्रोफाईल छान दिसणार आहे. मात्र, त्यासाठी तुम्हाला टाईमलाईन पाळावी लागेल. म्हणजेच फेसबुकच्या तुमच्या प्रोफाईलला ‘टाईमलाईन’ टॅग करावे लागेल. ‘टाईमलाईन’ टॅग केला की मग पहा,  तुमची प्रोफाईल हायटेक दिसेल आणि तुम्ही फेसबुकच्या प्रेमात पडाल.

‘टाईमलाईन’ हा नवा टॅग फेसबुकने तयार केल्याने तुमच्या प्रोफाईलला मस्तपैकी कव्हर, अपटेड, शेअर केलेले फोटो, कॉमेन्ट, मित्रांची लिस्ट. असे सगळे काही आता फेसबुकवर एकाच जागी दिसणार आहे.  इतकेच नव्हे तर जुने अपडेट तारखेनीशी बघता य़ेते.  यामुळे प्रोफाईलचा ‘फेस’ आणखी ‘स्मार्ट’ झाला आहे.

प्रोफाईला कव्हर म्हणून तुम्ही कोणाताही झकास फोटो निवडू शकता. त्याच्या बाजूला एका छोटया विंडोत तुमचा प्रोफाईल फोटो दिसेल. त्यासाठी तुम्ही थोडक्यात दिलेली माहिती दिसते. फेसबुकचे अकाउंट ओपन केल्यापासूनचे पोस्ट आणि इतर अँक्टीव्हिट तुम्ही सहज बघू शकता. सात दिवसांसाठी टाईमलाईनचा टॅग असेल.  यातील अँक्टिव लॉगला क्लिक केल्यानंतर तुम्ही काय काय अपडेट केले हे दिसते. हा लॉग फक्त तुम्हालाच पाहता येईल.

टाईमलाईन' टॅग कसा करणार

फेसबुकच्या तुमच्या प्रोफाईलला गेल्यावर ज्याठिकाणी अँड्रेसबार ( ttps://www.facebook.com/) आहे. त्याठिकाणी ‘टाईमलाईन’ (timeline) टॅग टाकणे आवश्यक आहे. timeline टाकल्यानंतर तुमची प्रोफाईल हायटेक दिसेल. एवढे केल्यावर थांबू नका. एक विंडो येईल. Introducing timeline आल्यानंतर तुम्ही अपडेट इम्फो आणि अँक्टीव्हिटी लॉग करा. तुमच्या प्रोफाईलला मस्तपैकी कव्हर, अपटेड, शेअर केलेले फोटो, कॉमेन्ट, मित्रांची लिस्ट दिसेल. मग करताय ना ‘टाईमलाईन' टॅग.