Zeenews logo
English   
Friday, May 24, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

येमेनमध्ये अल कायदाचा धर्मगुरु ठार

झी २४ तास वेब टीम, साना
 
अमेरिकेत जन्म झालेला अल कायदा या दहशतवादी संघटनेचा धर्मगुरु अन्वर अल-अवलाकी याला येमेनमध्ये ठार मारण्यात आल्याचे, येमेनमधील संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
 
संरक्षण मंत्रालयाने पत्रकारांना माहिती देताना सांगितले, की अल कायदाचा दहशतवादी अवलाकी याला त्यांच्या साथीदारांसह ठार मारण्यात आले आहे. सौदी अरेबियाच्या सीमेवर अल-जवाफ याठिकाणी शुक्रवारी सकाळी त्याला ठार मारले. अवलाकीसह आणखी चार दहशतवादी ठार झाले आहेत. अवलाकीला कसे ठार मारण्यात आले आहे, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. अमेरिकेकडून मे महिन्यात करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यात तो वाचला होता. अवलाकीच्या मृत्यूबद्दल अमेरिकन अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. अवलाकी हा येमेनमध्ये आपले काम करीत होता.

First Published: Sunday, October 09, 2011, 13:53

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: