सहावीतल्या विद्यार्थ्यांनी बनवला 'पॉर्न व्हिडिओ' - Marathi News 24taas.com

सहावीतल्या विद्यार्थ्यांनी बनवला 'पॉर्न व्हिडिओ'

www.24taas.com, मेक्सिको सिटी
 
साधारण सहावीतील शाळकरी मुलं दंगा मस्ती करताना पातळी किती ओलांडू शकतात? अकरा-बारा वर्षांची मुलांना कार्टून नेटवर्क पाहायला आवडतं, हा एक गैरसमज असावा अशी घटना मेक्सिकोमध्ये घडली आहे.
 
मेक्सिकोमधील कांपेशे प्रांतातील सहावीतल्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्येच पॉर्न व्हिडियो तयार केला आहे. आता अधिकारी या संपूर्ण घटनेची तपासणी करण्याच्या कामात गुंतले आहेत. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनीही ही घटना घडल्याचं मान्य केलं आहे.
 
एप्रिल महिन्यात एखाद्या रिकाम्या वर्गात सहावीतल्या विद्यार्थ्यांनी हा ‘प्रताप’ केल्याचं सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ शूट झाला असल्यामुळे ही घटना नाकारणं शाळेला अशक्य झालं आहे. त्यामुळे शाळेनेही ही घटना घडल्याचं आता मान्य केलं आहे. पण, शाळकरी मुलांच्या अशा प्रौढ चाळ्यांमुळे पालक मात्र चिंतीत झाले आहेत. घडल्या प्रकारामुळे सेक्स एज्युकेशनची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

First Published: Thursday, May 10, 2012, 22:32


comments powered by Disqus