इंडोनेशिया ओपन : ‘सायना’ सेमी फायनलमध्ये

Last Updated: Saturday, June 16, 2012 - 09:44

www.24taas.com, जकार्ता, इंडोनेशिया 

 

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिनं इंडोनेशियन ओपनच्या सेमी फायनलमध्ये धडक मारलीय. क्वार्टर फायनलमध्ये चीनच्या झियांग वँगला मात देत तिनं हा टप्पा गाठलाय.

 

क्वार्टर फायनलच्या रोमांचक लढतीत वर्ल्ड रँकिंगमध्ये पाचव्या स्थानावर असलेल्या सायनाची गाठ पडली ती वर्ल्ड रँकिंगमध्ये तिसऱ्या नंबरवर असलेल्या चीनच्या झियांग वँगला हिच्याशी... २१-१७, २१-२३, २१-१९ अशा फरकानं सायनानं झियांगला पछाडलं. सेमी फायनल गाठण्यासाठी सायनाला चांगलाच घाम गाळावा लागला.

 

आता सेमी फायनलमध्ये सायनाचा मुकाबला कोरियाच्या जी ह्युन सुंग हिच्याशी होईल. ह्युन सुंग हिने आपल्या जबरदस्त खेळाच प्रदर्शन करत चीनच्या वर्ल्ड नंबर टू असलेल्या जिन वांगला पराभूत करण्याची किमया केली आहे.

First Published: Saturday, June 16, 2012 - 09:44
comments powered by Disqus