ऑलिम्पिक 'गाव'... रासलीला चाललीये 'राव'

ऑलिम्पिक म्हणजे खेळांचा कुंभमेळाच... आणि याच कुंभमेळात अनेकजण हरवूनही जातात... अहो इतर कुठे दुसरीकडे नाही तर एका वेगळ्याच खेळामध्ये...एकीकडे ऑलिम्पिकमध्ये महत्त्वाचे खेळ सुरू असताना खेळाडू त्यांचे वेगळेच खेळ खेळत असतात.

Updated: Jul 12, 2012, 11:17 AM IST

www.24taas.com, लंडन

 

ऑलिम्पिक म्हणजे खेळांचा कुंभमेळाच... आणि याच कुंभमेळात अनेकजण हरवूनही जातात... अहो  इतर कुठे दुसरीकडे नाही तर एका वेगळ्याच खेळामध्ये...एकीकडे ऑलिम्पिकमध्ये महत्त्वाचे खेळ सुरू असताना खेळाडू त्यांचे वेगळेच खेळ खेळत असतात. म्हणजे खुद्द खेळाडूच रासलीलेमध्ये मश्गुल असतात. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये लक्ष देण्याऐवजी अनेक खेळाडू फक्त कामक्रीडेकडेच लक्ष देतात.

 

असा खळबळजनक खुलासा इंग्लंडच्या एका माजी ऍथलिटने ‘द सिक्रेट ऑलिम्पियन’ या आत्मचरित्रपर पुस्तकात केला आहे. दोन सुवर्णपदके जिंकणारा ३५ वर्षीय ऑलिम्पियन टॉड लॉडविकने ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान होणार्‍या खेळाडूंच्या नाना लीलांचा पर्दाफाश आपल्या पुस्तकात केला आहे. स्पर्धेदरम्यान ऑलिम्पिक गाव म्हणजे रासक्रीडा, ड्रग्ज आणि मद्यसेवनात धुंद असते. त्यामुळे ऑलिम्पिक काळात मद्य आणि कंडोम यांची मागणी पूर्ण करणे म्हणजे तारेवरची कसरतच असते.

 

सिडनी ऑलिम्पिकमध्ये (२०००) खेळाडूंसाठी ७० हजार कंडोम मागविण्यात आले होते, मात्र हे कंडोम अवघ्या एका आठवड्यात संपल्याने स्पर्धा संयोजकांची नंतर तारांबळ उडाली होती, असेही या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. ऑलिम्पिक गावात दोन प्रकारचे खेळाडू असतात. काही स्पर्धा संपेपर्यंत सेक्स, ड्रग्ज किंवा मद्यापासून दूर राहतात, तर काही खेळाडू ऑलिम्पिक गावात ्प्रवेश करताच ओल्याचिंब पार्ट्यांमध्ये धुंद होऊन जातात. प्रत्येक दिवसाची स्पर्धा संपल्यानंतर ऑलिम्पिक गावात सेक्स अन् मद्याची चंगळ सुरू होते. खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान दैनंदिन जीवनातील सेक्सपेक्षा अधिक सेक्स करतात, असा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे.