भारतीय हॉकी टीमने ब्राँझ मेडल पटकावलं

Last Updated: Sunday, June 3, 2012 - 22:32

www.24taas.com, नवी दिल्ली

 

भारतीय हॉकी टीमनं अझलन शहा हॉकी टुर्नामेंटमध्ये ग्रेट ब्रिटनचा 3-1 नं पराभव करत ब्राँझ मेडलची कमाई केली. मॅचच्या फर्स्ट हाफच्या अखेरच्या मिनिटाला ग्रेट ब्रिटनकरता ऍश्ले जॅक्सनने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत मॅचमध्ये 1-0ने आघाडी घेतली होती.

 

अखेर सेकंड हाफमध्ये भारताकडून शिवेंद्र सिंगनं 43व्या मिनिटाला पहिल्या गोलची नोंद केली. तर संदीप सिंगनं 52व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर दुसरा गोल नोंदवत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.

 

तुषार खांडेकरनं 69व्या मिनीटाला तिसरा गोल करत भारताचं ब्रॉन्झ मेडल पक्क केलं. अझलन शाह हॉकी टूर्नामेंट भारताकरता लंडन ऑलिम्पिक तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची होती.

 

 

 

 

First Published: Sunday, June 3, 2012 - 22:32
comments powered by Disqus