आज कुणाचं तिकीट होणार 'कर्न्फम'?

Last Updated: Wednesday, February 29, 2012 - 08:34

www.24taas.com, मुंबई

 

एशिया कपसाठी टीम इंडियाचं सिलेक्शन आज मुंबईत करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील टीम इंडियाची खराब कामगिरी पाहता सिलेक्शन कमिटीसमोर टीम इंडियाची निवड करणं आव्हानात्मक असणार आहे.

 

अनेक सिनियर्स प्लेयर्सना एशिया कपसाठी टीममधून वगळण्यात येणार असण्याची शक्यता आहे. सेहवाग, झहीर यांना टीममधून डच्चू मिळण्याची शक्यता असून. सचिनलादेखील विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे.

 

तर युवा प्लेअर्सची खराब कामगिरी आणि काही प्लेअर्सची दुखापत पाहता सिलेक्शन कमिटीसमोर टीम निवडच आव्हान असणार आहे. दरम्यान मुंबईचा अजिंक्य रहाणे आणि युसूफ पठाणला एशिया कपसाठी संधी मिळण्याची शक्यता आहे. ११ मार्च ते २२ मार्च दरम्यान बांग्लादेशमध्ये एशिया कपच आयोजन करण्यात आलं आहे.

 

 

 

First Published: Wednesday, February 29, 2012 - 08:34
comments powered by Disqus