आफ्रिकेचा 'वार', श्रीलंका ४३ रन्समध्ये 'गार'

Last Updated: Thursday, January 12, 2012 - 10:32

www.24taas.com, पार्ल

 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेत श्रीलंकेचा २५८ रन्सनी दारूण पराभव झाला आहे.दक्षिण आफ्रिकेनं ठेवलेल्या ३०२ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लंकनं टीम केवळ ४३ रन्सवर गारद झाली. कुलशेकराशिवाय लंकेचा एकही बॅट्समन दुहेरी आकडाही गाठू शकला नाही.

 

कुलशेकरानं १९ रन्स केलेत. लंकेचे ७ बॅट्समन केवळ २४ रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतेल होते. मॉर्ने मॉर्केल,त्सोसोबे आणि स्टेनच्या तेज माऱ्यापुढे लंकनं टीमची अक्षरश: भंबेरी उडाली. आणि केवळ ४३ रन्सवर लंकनं टीमनं दक्षिण आफ्रिकेपुढे सरेंडर केलं. मॉर्केलनं ४ तर त्सोत्सोबनं ३ विकेट्स घेतल्या. तर स्टेननं लंकेची १ विकेट् काढली.

 

लंकेचा वनडेमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव आहे. तर लंकेनं टीमनं केलेले ४३ रन्स वनडे क्रिकेटमधील चौथा लोएस्ट स्कोअर आहे. महत्वाचं म्हणजे यापूर्वीच्या तिन्ही लोएस्ट स्कोअर हे लंकनं टीमविरुद्धचे होते. मात्र आता लंकनं टीमवरच ही नामुष्की ओढवली.तर वनडे क्रिकेटमधील तिसरा सर्वात मोठा पराभव आहे.

 

 First Published: Thursday, January 12, 2012 - 10:32


comments powered by Disqus